नविन पेन्शन योजना रद्द करा; सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप SaamTvNews
महाराष्ट्र

नविन पेन्शन योजना रद्द करा; सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी, मध्यंतरीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सर्व सुविधा तात्काळ राज्यात लागू करण्यात याव्या, किमान पेन्शनमध्ये केंद्रसमान उचीत वाढ करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आज पासून दोन दिवस सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

हे देखील पहा :

सर्वांना समान किमान वेतन देऊन, कंञाटी व योजना कामगार (अंगणवाडी, आशा वर्कर्स, महिला परिचर) यांच्या सेवा नियमित करण्यात याव्या, शासकीय विभागात कोणत्याही स्वरुपाच्या खाजगीकरण, कंञाटी करणास सक्त विरोध, बक्षी समिती अहवालाचा खंड -2 प्रसिध्द करण्यात यावा, सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, सर्व भत्ते केंद्रासमान देण्यात यावेत, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त कराव्यात, तसेच कोरोना काळात विहित झालेल्या कर्मचाऱ्यांना विहित वय मर्यादेत सुट देण्यात यावी, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे, चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्यात याव्यात, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न तात्काळ सोडवावेत, निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावे, नवीन शिक्षण धोरण रदद करण्यात यावे, किंमती कमी करण्यासाठी पेट्रोलियम पदार्थांवरील केंद्रीय कर कमी करण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी सरकारी, निमसरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT